Collector declared holiday जिल्हाधिकारी बीड यांनी बीड जिल्ह्याकरिता तीन स्थानिक सूट्टी जाहीर केली आहे.
या बाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या वतीने निर्गमित करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या वतीने प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून अविनाश पाठक जिल्हाधिकारी बीड यांनी सन 2025 या वर्षाकरीता बीड जिल्ह्यासाठी तीन स्थानिक सूट्टी जाहीर केली आहे.
जिल्हाधिकारी बीड यांनी खालील तीन स्थानिक सूट्टी जाहीर केल्या आहेत.
- सोमवार दिनांक 11 ऑगस्ट 2025 तिसरा श्रावण सोमवार
- सोमवार 01 सप्टेंबर 2025 जेष्ठागौरी पूजन.
- सोमवार 20 ऑक्टोबर 2025 नरक चतूर्दशी.
या तीन स्थानिक सूट्टी बीड जिल्ह्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत.
उपरोक्त जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सूट्या राज्य न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये, केंद्रीय प्रशासनातील कार्यालये, बँकेच्या कक्षेतील कार्यालये या कार्यालयाखेरीज बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये,जिल्हा परीषद अंतर्गत असलेली सर्व कार्यालये, जिल्ह्यातील शासकीय कोषागारे, महामंडळाची कार्यालये, व इतर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांना लागू असणार आहे.
0 Comments